माय मराठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत !!! मराठी भाषेतील शैक्षणिक व्यासपीठ असणाऱ्या या संकेतस्थळावर एकूण 2 मेनूबार आहेत. याखालील इमेजेसवर क्लिक केल्यास डायरेक्ट त्याच्या वेबसाईटवर नेले जाईल. त्याखालील मेनूबार हा Dropdown मेनूबार असून त्याखालील मेनूवर क्लिक केल्यास त्याखालील सबमेनू येतो व सबमेनूप्रमाणे माहितीस्थळ दर्शविले जाते.ब्लॉगवरील हवी ती माहिती शोधण्यासाठी डावीकडील स्लाइडबारच्या वर search पर्यायाचा वापर करा. ब्लॉगवर उपलब्ध अफाट माहिती विश्वातून आपणास हवी ती माहिती शोधून देण्यास ते मदत करते.
  • ①मुख्यपृष्ठ
  • ② डाउनलोड➠
  • ③ज्ञानरचनावाद➠
  • ④Online कार्यशाळा➠
  • ⑤Imp वेब्स➠
  • ⑥उपक्रमांचे जग➠
  • ⑦ई-लर्नींग/शै.ॲप्स➠
  • अप्रगत विद्यार्थ्यांसाठी वाचन टप्पे

    🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
    🌼 महाराष्ट्र ॲडमीन पँनल प्रस्तुत उपक्रम
    🌼🌼🌼🌼🌼🌼

    🎄🎄🎄🎄🎄🎄🎄
    🎄चला बनवूया प्रगतवर्ग
    🎄🎄🎄🎄🎄🎄🎄

    🔆🔆🔆🔆🔆🔆🔆
    🔆उपक्रमांची मांदीयाळी-[अंक- तिसरा]🔆
    🔆🔆🔆🔆🔆🔆🔆

    💢💢💢💢💢💢💢
    💢 ज्ञानरचनावाद पध्दतीने वाचन कसे शिकवावे 💢
    💢💢💢💢💢💢💢

    🌀आपल्या अध्यापनामध्ये खास ज्ञानरचनावाद पध्दतीचा उपयोग करु इच्छिणाऱ्यांसाठी

    🔮वाचन अधिगम विद्यार्थी, डिस्लेक्सिया, मुखदुर्बल, मतिमंद, वाचादोष, मतिमंद अशा विशेष विद्यार्थ्यांनाही ही पध्दती थोड्याफार फरकाने वापरता येते.

    💡या पध्दतीचा उपयोग करण्यासाठी याच अंकातील भाग-1 "वाचनाचे टप्पे" हा लेख वाचने आवश्यक.
    हा पुर्ण लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

    ⚠️ वरील लेखात दिलेला वाचनाचा दुसरा टप्पा व तिसरा टप्पा हे प्रकट वाचनाशी संबंधित आहेत. आता आपण पाहणार आहोत, ज्ञानरचनावाद पध्दतीने प्रकट वाचन कसे शिकवावे.

    🚧 ज्ञानरचनावाद पध्दतीने वाचन ढोबळमानाने एकूण सात टप्यात शिकविले जाते-

    1. वाचन पुर्वतयारी
    2. अक्षर ओळख
    3. स्वरचिन्हे ओळख
    4. जोडशब्द ओळख
    5. वाक्यवाचन
    6. परिच्छेद वाचन
    7. आकलन

    🔴पहिला टप्पा
    👇👇👇👇👇👇👇👇
    🎯 वाचन पुर्वतयारी 🎯

    या टप्प्यात खालील प्रकारे वाचनपुर्व तयारी करुन घ्यावी.

    1.नजरेने आकारातील साम्यभेद ओळखणे.

    2. साम्यभेदाआधारे चित्रवाचन करणे.

    3.परिचीत चित्रांसोबत त्याच्या शब्दकार्डांचे अंदाजे वाचन करणे.

    4.वाचनासाठी डावीकडुन उजवीकडे नजर फिरविण्याचा सराव.

    5. बोललेले शब्द डावीकडुन उजवीकडे लिहिले जातात हे समजणे.

    6. शब्दकार्डांचा संबंध चित्राशी व इतर दृश्य वस्तुशी जोडणे, याचा सराव. यासाठी आपापल्या कल्पकतेनुसार व परिस्थितीप्रमाणे विविध उपक्रम घेता येतात.
    उदा- [खालील उदाहरणे नमुनादाखल आहेत]

    1. आपल्या वर्गातील सर्व मुलांच्या नावाचे नामपट्या बनवून घ्या. या नाम पट्या त्यांना हाताळण्यास द्या. उपस्थित विद्यार्थीनी आपापल्या नावाचे टँग भिंतीस लावण्यास सांगणे.सर्व पट्या एकत्रीत करुन त्यामधून स्वतःच्या नावाची नामपट्टी ओळखण्यास सांगणे. नंतर नंतर इतर विद्यार्थ्यांच्या नामपट्या ओळखण्यास सांगणे. मुले स्वतःचे व इतराचे नाव चार दिवसात ओळखण्यास वाचण्यास शिकतात.


    2. वर्गातील वस्तुंच्या नामपट्या दोन संचामध्ये तयार करुन घ्या.एक संचातील पट्ट्या वस्तूंना डकवा. दुसऱ्या संचातील पट्ट्या मुलास द्या. तुझ्या पट्टीवर जे नाव लिहिले आहे ती वस्तू शोधण्यास  सांगणे. किंवा एखाद्या वस्तूची नामपट्टी शोधून काढण्यास सांगणे.

    3. परिचित चित्रांचा व त्याच्या नामपट्यांचा वापर करुन विविध खेळ घेऊ शकतो.

     -सलग तीन दिवस मुलांना चित्र व त्याखाली शब्दकार्ड लावून वाचन करुन घ्या. नंतर चित्राखाली बोट ठेवुन नावाचे वाचन घ्या. सर्वांस शब्दकार्ड वाटा.व एकच चित्रकार्ड दाखवुन याचे नाव कोणाकडे आहे त्याला पुढे बोलवा. चित्रशब्दकार्डाखाली लावुन खात्री करु द्या.अशीच सर्व चित्रशब्दकार्ड शोधण्याचा सराव घेणे.
    पुढील तीन दिवस शब्दकार्डाची शब्दकार्डाशी जोड्या लावणे खेळ घेणे.
    पुढील तीन दिवस शब्दकार्डाची चित्रकार्डाशी जोडी लावणे.

    -चित्रपट्टीच्या खाली इतर चित्रांचे नाव टाका. अशा खुप चित्रपट्या बनवा. आता एक चित्रपट्टी विद्यार्थ्यांस द्या.व त्याखालील नाव वाचून त्याचे चित्र असणारी चित्रपट्टी शोधून त्यासमोर लावा. आता या चित्रपट्टीच्या खालील नावानुसार पुढील चित्र, त्यानंतर त्यापुढील चित्र अशी चित्रांची आगगाडी बनविण्यास सांगा.

    -असे अनेक चित्र-शब्द खेळ घेता येतात. शब्द मर्यादेमुळे सर्व येथे मांडणे शक्य नाही.

    7. दहा शब्द झाले की, वाक्यवाचन सुरु करावे.
    उदा- हा आंबा(चित्र)आहे. असे वाचन करणे. नंतर चित्राजागेवर शब्द ठेवुन वाक्य वाचनाचा सराव घेणे.

    8. दृकशब्दसंपत्ती वाढ ४० पर्यंत जाणे ही वाचनपुर्वतयारी झाली. इथपर्यंत मुले अंदाजाने वाचतात पुर्ण शब्द वाचतात.पण हे प्रत्यक्ष वाचन नव्हे.

    9. प्रत्यक्षवाचनासाठी मुले शब्दाचा एकत्रित विचार करतात व वाचन सुलभ होते.

    ------------------------------------------------------

    पूढील टप्पे वाचण्यासाठी खालील टप्प्यांवर क्लिक करा.

    2. अक्षर ओळख

    3. स्वरचिन्हे ओळख

    🈸पुढील टप्पे पुढील लेखमालेत सविस्तरपणे पाहू!

    🎏संदर्भ- कुमठे बीट उपक्रम

    👉➡👉➡👉➡ क्रमशः

    🔱तुम्हीही तुमच्या वर्गामध्ये असेच उपक्रम राबवत असाल तर आपले लेख, साहित्य फोटो, प्रतिक्रिया मला 9011104464 वर अवश्य कळवा. निवडक लेख व फोटोंना आपल्या नावासह ब्लॉगवर प्रसिध्द केले जाईल.