माय मराठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत !!! मराठी भाषेतील शैक्षणिक व्यासपीठ असणाऱ्या या संकेतस्थळावर एकूण 2 मेनूबार आहेत. याखालील इमेजेसवर क्लिक केल्यास डायरेक्ट त्याच्या वेबसाईटवर नेले जाईल. त्याखालील मेनूबार हा Dropdown मेनूबार असून त्याखालील मेनूवर क्लिक केल्यास त्याखालील सबमेनू येतो व सबमेनूप्रमाणे माहितीस्थळ दर्शविले जाते.ब्लॉगवरील हवी ती माहिती शोधण्यासाठी डावीकडील स्लाइडबारच्या वर search पर्यायाचा वापर करा. ब्लॉगवर उपलब्ध अफाट माहिती विश्वातून आपणास हवी ती माहिती शोधून देण्यास ते मदत करते.
  • ①मुख्यपृष्ठ
  • ② डाउनलोड➠
  • ③ज्ञानरचनावाद➠
  • ④Online कार्यशाळा➠
  • ⑤Imp वेब्स➠
  • ⑥उपक्रमांचे जग➠
  • ⑦ई-लर्नींग/शै.ॲप्स➠
  • 3. आवडती वस्तू खायला देणारा प्याला

     🍺😄🍺😄🍺😄🍺
      🍀🍀 जादूचे प्रयोग भाग-3🍀🍀
     🌺 आवडती वस्तू खायला देणारा प्याला 🌺

    जादूगर सुर वातीला प्रेक्षकांना महाभारतातील अक्षय्य पात्र (इच्छा असणारे पदार्थ देणारे पात्र) याविषयी माहिती रंगवून सांगतो याच पात्रातील वस्तू खावून पाडंव बलवान झाले  असेही सागंतो व मलासुद्धा  देवाने प्रसन्न होवून एक पेला दिला आहे व हा पेला तुम्हाला हवा असणारा कोणताही पातळ पदार्थ देवू शकतो असे सांगून प्रेक्षकांना त्यानां कोणत्या वस्तू हव्या आहेत हे विचारतो.
             🍺  🍺 दुध चहा कॉफी कोकाकोला लेमनसोडा ताक दही काहीजण बासुंदी सुद्धा मागतात
    लोकांच्या मनातील उत्साह पाहुन जादूगर वेगवेगळ्या कृती करत पेल्याला तुम्ही मागीतलेल्या वस्तू देण्याची विनंती करतो.
     नतंर तो जादूगर  खिश्यातील काळा रूमाल काढून टेबलवर एका प्यालावर ठेवतो व जादूची छडी फिरवून 1,2,3 म्हणत झटक्याने रूमाल उचलतो तो काय प्याला गायब फक्त एक साधा रूमाल असतो रूमाल मागुन पुढून प्रेक्षकांना दाखवून परत खिशात ठेवतो व प्रेक्षकांना सागंतो की तुम्ही सर्वांनी वेगवेगळे पदार्थ मागीतले  म्हणून पेला घाबरला व पळून गेला व आता माझीसुद्धा पंचाईत  झाली.

    🌺🌺कृती🌺🌺
    जादूगाराचा रूमाल काळा रंगाचा व दुहेरी असतो दोन्ही रूमालाचे काठ शिवत असतांना आत  एक प्लॅस्टिक ची बागंडी नेमकी प्याल्याच्या तोडांच्या आकाराची शिवून ठेवलेली असते बाजुच्या कडा शिवून झाल्यावर ती बागंडी फिक्स राहावी  म्हणून तिला ही शिवणे आवश्यक आहे
              टेबलावर प्याला ठेउन त्यावर हा रूमाल झाकला जातो वर उचलून प्रेक्षकांसमोर नेतांना टेबलाच्या आड ठेवलेल्या टोपलीत अलगद ठेवला जातो त्यामुळे शिवलेल्या बागंडी चा भागच आता जादूगाराच्या हातात राहतो त्यामुळे हातात प्यालाच धरला आहे असे प्रेक्षकांना वाटते रूमालात शिवलेल्या बागंडीमुळे हा भास होतो.

    🌳🍂आपण स्नेहसंमेलन मध्ये यावर एखादी छोटी नाटीकासुद्धा बसवू शकतो🌴🌲🌱

            सुधीर बोरेकर 9420714903
    गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती