माय मराठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत !!! मराठी भाषेतील शैक्षणिक व्यासपीठ असणाऱ्या या संकेतस्थळावर एकूण 2 मेनूबार आहेत. याखालील इमेजेसवर क्लिक केल्यास डायरेक्ट त्याच्या वेबसाईटवर नेले जाईल. त्याखालील मेनूबार हा Dropdown मेनूबार असून त्याखालील मेनूवर क्लिक केल्यास त्याखालील सबमेनू येतो व सबमेनूप्रमाणे माहितीस्थळ दर्शविले जाते.ब्लॉगवरील हवी ती माहिती शोधण्यासाठी डावीकडील स्लाइडबारच्या वर search पर्यायाचा वापर करा. ब्लॉगवर उपलब्ध अफाट माहिती विश्वातून आपणास हवी ती माहिती शोधून देण्यास ते मदत करते.
  • ①मुख्यपृष्ठ
  • ② डाउनलोड➠
  • ③ज्ञानरचनावाद➠
  • ④Online कार्यशाळा➠
  • ⑤Imp वेब्स➠
  • ⑥उपक्रमांचे जग➠
  • ⑦ई-लर्नींग/शै.ॲप्स➠
  • 1. सोपे जादूचे प्रयोग

                         💐👍💐👍💐👍💐
    विद्यार्थी ना करून दाखविण्यासारखे जादूचे प्रयोग

    🌺जादू कुंकू काळे करण्याची🌺
      शिक्षीत लोकांनी आपल्या शिक्षणाचा व विज्ञानाचा उपयोग करून अंधश्रद्धेचे निर्मुलन केले पाहिजे
      अर्धा लहान चमचाभर कुंकू वात निरमा पावडर घ्या निरमा पावडरातअल्कली असते आणि कुकंवात अल्कली मिळताच काळे होते
     नेमके हिच कृती करून बुवालोक स्त्रियांना घाबरवून त्यांच्या मनात भीती निर्माण करतात.

    🌺जादू हळदीचे कुंकू करण्याची🌺
          बाबालोक हळदीमध्येथोडा प्रमाणात आधीच निरमा पावडर मिसळून ठेवतात निरमा पावडर अल्कली असते आणि अल्कली मुळे हळद लाल होते नेमके हिच कृती करून बाबालोक भोळ्याभाबड्या स्त्रियांना घाबरवून फसवितात.

    🌺 कोणतीही वस्तू गोड करणे🌺
    सॅकरीन साखरेपेक्षा कित्येक पटीने गोड असते  बाबालोक ज्याही वस्तू ला हात लावतील ती वस्तू गोड होते तिर्थ गोड होते यासाठी बाबालोकांनी सॅकरीनच्या गोळ्यांची पावडर आधीच हाताच्या बोटाला चोळली असते बिचारे भक्त यापासून अनभिज्ञ असतात आणि याच गोष्टीचा फायदा बाबा उचलतात

    🌺लिबांतून रक्त काढणे🌺
    साहित्य--एक लिबूं  चाकू मिथील ऑरेंज च द्रावण
    चाकुच्या पात्याला मिथील ऑरेंज च द्रावण लावावे थोड्या वेळाने त्या चाकुणे लिबूं कापल्यास लाल रक्ताप्रमाणे रस बाहेर येतो हि। कृती तुम्ही कोणत्याही मंत्र न म्हणता करू दाखवू शकतात व लोकांच्या मनातील अंधश्रद्धा दूर करू शकता.

    🌺ताब्यांचे भांडे वर उचलणे🌺
    ताब्यांचे लोटि घ्या(भरणे) घ्या ते काठोकाठ तांदूळाणे भरूण घ्या त्यामध्ये एक साधारण मोठा पेचकस घेवून तो 4ते5 वेळा टोचा तांदूळाचे दाणे हवा निघून गेल्यावर एकदम फिट होतात तेव्हा पेचकस वर उचलूण घ्या ताब्यां वर उचलला जाईल.

    🌺 पृथ्वी तून परमेश्वर प्रगट करणे🌺
    हा प्रयोग विद्यार्थी ना शाळेत करूण दाखवा
     एक जमिनीमध्ये खड्डा खोदा त्यामधे आधीच एक दोन किलो चणे टाकूण ठेवा त्यावर मुर्ती समजून एक चापट दगड ठेवा व वर माती झाकून ठेवा  दोन तिन दिवस त्यावर थोडे थोडे पाणी घालावे  चौथ्या दिवशी मुर्ती म्हणून दगड वर येइल विद्यार्थी ला यामागचे शास्त्रीय कारण समजावून द्या.

     🌺 मत्रांने होम पेटविणे🌺
      कृती. ... फाॅस्षरस कपड्यात गुडांळुन सफाईदार पणे होमात ठेवले जाळ होइल किंवा कागदावर पोटॅशियम परमॅग्नेट आधीच लाकडामध्ये टाकूण ठेवून त्यावर तुप ओता(येथे तुप म्हणून ग्लिसरीन ओतावे  म्हणजे आपोआप जाळ होइल ग्लिसरीन मध्ये पेट्रोल टाकल्यास ही क्रिया लवकर होते
     सर्व प्रयोग करतांना भोदूंबाबाची अॅकटीग करावी म्हणजे प्रयोगामध्ये जिवंतपणा येइल लहान मुलांना प्रत्यक्ष प्रयोग करू न देता समजावून करून दाखवावे  हे प्रयोग विज्ञान प्रदर्शनी मध्ये करून दाखवू शकता
         सुधीर बोरेकर गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती