माय मराठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत !!! मराठी भाषेतील शैक्षणिक व्यासपीठ असणाऱ्या या संकेतस्थळावर एकूण 2 मेनूबार आहेत. याखालील इमेजेसवर क्लिक केल्यास डायरेक्ट त्याच्या वेबसाईटवर नेले जाईल. त्याखालील मेनूबार हा Dropdown मेनूबार असून त्याखालील मेनूवर क्लिक केल्यास त्याखालील सबमेनू येतो व सबमेनूप्रमाणे माहितीस्थळ दर्शविले जाते.ब्लॉगवरील हवी ती माहिती शोधण्यासाठी डावीकडील स्लाइडबारच्या वर search पर्यायाचा वापर करा. ब्लॉगवर उपलब्ध अफाट माहिती विश्वातून आपणास हवी ती माहिती शोधून देण्यास ते मदत करते.
  • ①मुख्यपृष्ठ
  • ② डाउनलोड➠
  • ③ज्ञानरचनावाद➠
  • ④Online कार्यशाळा➠
  • ⑤Imp वेब्स➠
  • ⑥उपक्रमांचे जग➠
  • ⑦ई-लर्नींग/शै.ॲप्स➠
  • कुमठे बीट 5 - पात्र संवाद

    🙏🏻 नमस्कार 🙏🏻

    कुमठे बिट शैक्षणिक अनुभव क्र. ५

    ✴ पात्र संवाद :
     
            या उपक्रमात वर्गातील कमीत कमी २ मुले घेऊ शकतो. त्या दोघानाही वेगवेगळे पात्र नावे द्यावीत व त्यांनाच संवाद तयार करून बोलण्यास सांगावे.
            उदा. २ मुलांपैकी एक मुलाला बेडूक व दुसऱ्या मुलाला चिमणी अशी पात्रांची नावे द्यावीत. त्यांना संवाद तयार करून बोलण्यास सांगावे.
         जसे,
      बेडूक :  नमस्कार मी बेडूक आहे.
    चिमणी :  नमस्कार मी चिमणी आहे.
      बेडूक :  तू कुठे राहतेस?
    चिमणी :  मी झाडावर राहते आणि तू
      बेडूक :  मी पाण्यात व जमिनीवर.
    चिमणी :  तूला उड़ता येते का?
      बेडूक :  नाही, तुला पोहता येते?
    चिमणी :  नाही.
                  इत्यादी. या पद्धतीने सोपे पात्र देऊन सहज असे संवाद मुले तयार करतात.

    ✴ या उपक्रमातून पुढील बाबी साध्य होतात :
    १) मुलांना मनोरंजक पद्धतीने संवाद, संभाषण, नाट्यिकरण व सादरीकरण या बाबींकडे नेता येते.
    २) संभाषण कौशल्याचा विकास साधता येतो.
    ३) एकदा संवाद करता आला की विद्यार्थ्यात आत्मविश्वास वाढतो.
    ४) संबंधित पात्राविषयीच  अथवा घटनेविषयीच प्रश्न निर्मिति करण्याचे कौशल्य विकसित होते.
    ५) ठराविक सरावानंतर विद्यार्थी दिलेल्या पात्राचा हुबेहुब आवाज़ काढून नक्कल करण्याचा प्रयत्न करतात.
    ६) बौद्धिक थकवा दूर करणे व मनोरंजनातून शिक्षण देणे साध्य होऊ शकते.

             या उपक्रमातून मला आलेला अनुभव असा की, मी पहिल्या दिवशी मुलांना पात्र ठरवून दिले आणि संवाद साधायला लावला. पण दुसऱ्या दिवशी मुलांनी स्वतःहून मला सांगितले की ते कोणते पात्र होणार आहेत. यांत विशेष म्हणजे एक मुलगा राष्ट्रीय प्राणी व दूसरा मुलगा राष्ट्रीय फूल बनला. माझ्या अपेक्षेपेक्षा अधिक विचार त्या दोघांनी करून खुप सुंदर असे संवाद सादर केलेत.
                English चे पण conversation चा भाग या उपक्रमातून घेता येऊ शकतो. मोठ्या इयत्तासाठी पाणी-हवा, रोबोट-मनुष्य इत्यादी पात्र ठरवून संवाद घेता येतील.
            धन्यवाद!!!
                 श्रीमती गौरी पाटील.
      उपशिक्षिका शाळा चांदाेरी( मुले)
            ता.निफाड जि.नाशिक