माय मराठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत !!! मराठी भाषेतील शैक्षणिक व्यासपीठ असणाऱ्या या संकेतस्थळावर एकूण 2 मेनूबार आहेत. याखालील इमेजेसवर क्लिक केल्यास डायरेक्ट त्याच्या वेबसाईटवर नेले जाईल. त्याखालील मेनूबार हा Dropdown मेनूबार असून त्याखालील मेनूवर क्लिक केल्यास त्याखालील सबमेनू येतो व सबमेनूप्रमाणे माहितीस्थळ दर्शविले जाते.ब्लॉगवरील हवी ती माहिती शोधण्यासाठी डावीकडील स्लाइडबारच्या वर search पर्यायाचा वापर करा. ब्लॉगवर उपलब्ध अफाट माहिती विश्वातून आपणास हवी ती माहिती शोधून देण्यास ते मदत करते.
  • ①मुख्यपृष्ठ
  • ② डाउनलोड➠
  • ③ज्ञानरचनावाद➠
  • ④Online कार्यशाळा➠
  • ⑤Imp वेब्स➠
  • ⑥उपक्रमांचे जग➠
  • ⑦ई-लर्नींग/शै.ॲप्स➠
  • कुमठे बिट - शैक्षणिक प्रेरणास्थळ

    कुमठे बिट - शैक्षणिक प्रेरणास्थळ

    राज्याचे शिक्षण सचिव मा.नंदकुमार साहेब यांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचा नारा दिला आहे आणि कधी नव्हे तसा संपूर्ण शिक्षण विभाग ढवळून निघाला आहे, सर्व शिक्षक जोमाने कामाला लागले आहेत. परंतु सर्व मुले प्रगत करायची म्हणजे एक फार मोठे दिव्य असे बऱ्याच जणांना वाटत होते किंवा अनेकांच्या मनात तशी शंका होती. अर्थातच माझ्याही मनात होतीच.
          जेंव्हा असा एखादा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवायचा असेल तेंव्हा ती गोष्ट कुणी करुन पाहिली आहे का किंवा त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट्स कोणाला मिळाले आहेत का याचीही माहीती घेणे आवश्यक ठरते. हे जरीही अशक्य वाटत असले तरीही ही किमया साध्य केली आहे ती प्रतिभा भराडे यांनी आपल्या कुमठे बीट मधील 40 शाळांमधुन. 100 टक्के प्रगत मुले बनविण्यासाठी त्यांनी ज्ञानरचनावाद या अभिनव संकल्पनेचा अंगीकार त्यांच्या बीट मधील प्रत्येक शाळेमधुन केलाय.
               मा सचिव नंदकुमार साहेबांनी बीड येथील कार्यशाळेत कुमठे बीटला भेट देऊन ज्ञानरचनावादाचा अभ्यास आणि अंगीकार करण्याबाबत आवाहन केले होते. त्या अनुषंगाने बीड जि.प. चे माध्यमिक शिक्षणाधिकारी मा. सुरजप्रसाद जैस्वाल साहेब यांनी आष्टी तालुक्यातील आमचे पारगाव जोगेश्वरी हे केंद्र दत्तक घेतले. त्यांनी केलेल्या सुचनेनुसार गटशिक्षणाधिकारी मा.धनंजय शिंदे यांनी आमच्या केंद्रातील 30 शिक्षकांच्या कुमठे बीट भेटीचे नियोजन केले. नियोजनाप्रमाणे दिनांक 20 ऑक्टोबर रोजी आम्ही सर्वजण कुमठे बिट येथे पोहोचलो. शिविअ प्रतिभा भराडे यांनी आम्हाला शालाभेटिला आरे ही शाळा दिली. आमच्या मनात त्या शाळेत जाईपर्यंत ज्या काही शंका होत्या त्या सर्व तिथे गेल्यानंतर कुठच्या कुठे पळून गेल्या.
               या शाळेत आम्ही पाहिलेल्या काही गोष्टी.
    👉 एकही मूल अप्रगत नाही.
    👉शिक्षक शिकवित नाहीत, फ़क्त शिकन्यास मदत करतात.
    👉मुले पूर्णपणे कृती करुन ज्ञानरचनावादी पद्धतीने शिकतात.
    👉पहिलीची मुले दिलेल्या अक्षरापासून शब्द वाक्य तयार करतात.
    👉दूसरी पासूनची मुले चार शब्दांपासून अतिशय सुंदर गोष्ट तयार करतात.
    👉गणितच्या सर्व मुलांच्या सर्व संकल्पना स्पष्ट आहेत. 👉पारंपारिक खेळांच्या माध्यमातून हस्तकौशल्ये आणि स्नायुंचा व्यायाम करून घेतला जातो.
    👉प्रत्येक शाळेत परसबाग़ आहे.परिसर अभ्यासाचा संपूर्ण अभ्यास मुलांना या परसबागेतच होतो.
     👉शाळेत विविध औषधी वनस्पती आहेत, त्यांचे उपयोग मुले सांगतात.
    👉विविध खेळांच्या माध्यमातून मुलांच्या मेंदूला आव्हाने दिली जातात.
    👉मुलांना शिकण्याचे पूर्णपणे स्वातंत्र्य दिले आहे.
    👉प्रत्येक शाळेत वाचन कुटी आहे. मुले मधल्या सुटित या कुटित बसून वाचन करतात.
    👉शाळेतील दोन्ही शिक्षिका प्रचंड उत्साही आणि कार्यशील दिसून आल्या.
    👉सायंकाळचे सहा वाजले तरी मुले प्रचंड उत्साही होती कुठेही थक़वा किंवा कंटाळा जाणवला नाही. मुले शाळेतून घरी जायला तयार नव्हती.
     👉शाळेत भाषा आणि गणित याबरोबरच इंग्रजी विषयातील मुलांची प्रगतीही उत्तम दिसून आली.
    👉या भेटिमध्ये आमच्यासोबत शिक्षणाधिकारी जैस्वाल साहेब आणि गटशिक्षणाधिकारी शिंदे साहेब विविध गोष्टी जाणून घेत होते. कुठलाही बड़ेजाव नव्हता.
    👉शाळेच्या भौतिक सुविधा जेमतेमच होत्या परंतु प्रत्येक गोष्टीचा कल्पकतेने वापर केला होता.
    👉अगदी टाकावु वस्तुपासून शैक्षणिक साहित्य तयार केले होते.आणि मुले त्यांचा वापर करत शिकत होती.
    👉कुमठे बिटमध्ये शैक्षणिक नंदनवन फुलविणाऱ्या प्रतिभा भराडे यांनी सायंकाळी या शाळेत येऊन आमच्या सर्व शंकांना समर्पक उत्तरे देऊन आम्हाला ज्ञानरचनावादाची सुरुवात कशी करावयाची याबाबत मार्गदर्शन केले.
    👉आतपर्यंतच्या 10-20 वर्षात आम्ही जे शिकलो नाही ते या एकाच भेटीत शिकलो.



           "दिव्यत्वाची जेथे प्रचिती,
                 तेथे कर माझे जुळती ।"

    या उक्तिप्रमाणे खरेच दिव्यत्वाची प्रचिती आम्हाला या भेटित आली. ही संधि आम्हाला उपलब्ध करुन दिल्याबद्दल शिक्षणाधिकारी जैस्वाल साहेब. BEO शिंदे साहेब आणि प्रतिभा भराडे मॅडम यांचे आम्ही सदैव ऋणी राहु. आणि दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर पारंपारिक पद्धतिला फाटा देऊन ज्ञानरचनावादाचा अंगीकार करुन प्रत्येक मूल प्रगत करू आणि नंदकुमार साहेबांचे स्वप्न साकार करू .....!!!

       शब्दांकन :-
           सोमनाथ वाळके.
    जि.प.कें.प्रा.शाळा पारगाव (जोगे.)
    ता :- आष्टी, जि :- बीड
    7588535777
    somnathwalke007@gmail.com

    www.somnathwalke.in