माय मराठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत !!! मराठी भाषेतील शैक्षणिक व्यासपीठ असणाऱ्या या संकेतस्थळावर एकूण 2 मेनूबार आहेत. याखालील इमेजेसवर क्लिक केल्यास डायरेक्ट त्याच्या वेबसाईटवर नेले जाईल. त्याखालील मेनूबार हा Dropdown मेनूबार असून त्याखालील मेनूवर क्लिक केल्यास त्याखालील सबमेनू येतो व सबमेनूप्रमाणे माहितीस्थळ दर्शविले जाते.ब्लॉगवरील हवी ती माहिती शोधण्यासाठी डावीकडील स्लाइडबारच्या वर search पर्यायाचा वापर करा. ब्लॉगवर उपलब्ध अफाट माहिती विश्वातून आपणास हवी ती माहिती शोधून देण्यास ते मदत करते.
  • ①मुख्यपृष्ठ
  • ② डाउनलोड➠
  • ③ज्ञानरचनावाद➠
  • ④Online कार्यशाळा➠
  • ⑤Imp वेब्स➠
  • ⑥उपक्रमांचे जग➠
  • ⑦ई-लर्नींग/शै.ॲप्स➠
  • आकारीक-संकलित मूल्यमापनाबाबत सर्वकाही

    # संकलित मूल्यमापन => 
    एका शैक्षणिक वर्षात प्रथम सत्राच्या अखेरीस एकदा व द्वितीय सत्राच्या अखेरीस एकदा असे दोनवेळा संकलित मूल्यमापन करावे लागते. यातील तोंडी व प्रात्यक्षिक मिळून 10 गूण असतात. आपणास योग्य वाटेल त्या प्रकारास 10 पैकी गूण दिले जातात. शक्यतो गणित, विज्ञान, भूगोल अशा विषयास प्रात्यक्षिक घ्यावे. खालील दिलेल्या तोंडी व प्रात्यक्षिक गुणात 10 पैकी बदल करता येतात.

       वर्ग      तोंडी गूण   प्रात्यक्षिक गूण  लेखी गूण  एकूण गूण 
    1ली व 2री           05              05            20           30   
    3री व 4थी           05              05            30           40   
    5वी व 6वी           10              00            40           50   
    7वी व 8वी           10              00            50           60   

    टिप -  कला, कार्यानुभव व शारीरिक शिक्षण या विषयाचे संकलित मूल्यमापन केले जात नाही.

    # आकारिक मूल्यमापन => 
          विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्व आकार घेत असताना प्रत्येक टप्प्यावर  नियमीतपणे करण्याचे मूल्यमापन म्हणजे आकारिक मूल्यमापन . आकारिक मूल्यमापन हे पुढील साधनतंत्रांचा उपयोग करुन विद्यार्थ्याच्या नकळतपणे वर्षभर केले जाते.
    1) दैनंदिन निरीक्षण - विद्यार्थ्यांच्या दैनंदिन वर्तनाचे यात निरीक्षण करुन लिखीत नोंदी केल्या जातात. या तंत्रास गूण दिले जात नाहीत. या तंत्राच्या अधिक माहितीसाठी व विषयवार निरीक्षण नोंदीसाठी इथे क्लिक करा.

    2) तोंडी काम - प्रश्नोत्तरे, प्रकटवाचन, भाषण, संभाषण, भूमिकाभिनय, मुलाखत, गटचर्चा इत्यादीमध्ये विद्यार्थी कसा प्रतिसाद नोंदवतो, यावरुन या तंत्रास गूणदान केले जाते.
    वर्गवार तोंडीकामाची यादी डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

    3) प्रात्यक्षिक / प्रयोग -
    वर्गवार प्रात्यक्षिक व प्रयोग यादी डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

    4) उपक्रम / कृती (वैयक्तिक, गटांत, स्वयंअध्ययनाद्वारे)
    वर्गवार उपक्रम व कृती यादी डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

    5) प्रकल्प - एका इयत्तेमध्ये कोणत्याही एका विषयात किमान एका सत्रात तरी प्रकल्प घ्यावा असे बंधन आहे. प्रकल्पाविषयी  संपूर्ण माहितीसाठी इथे क्लिक करा.
    वर्गवार प्रकल्प यादी डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
    विषयवार प्रकल्प यादी डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
    6) चाचणी –  वेळापत्रक जाहीर न करता अनौपचारीक स्वरुपात ही चाचणी घेतली जाते.  प्रत्येक सत्रात किमान एक छोट्या कालावधीची पुस्तकांसह लेखी चाचणी (Open book test) घेणे अपेक्षित आहे. या चाचणीतील प्रश्न वस्तूनिष्ट न घेता विचारप्रवर्तक घ्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
    7) स्वाध्याय / वर्गकार्य - मुलांच्या सृजनशिलतेला चालना देणारे स्वाध्याय किंवा वर्गकार्यास यात गूणदान केले जाते.
    8) इतर – (प्रश्नावली, सहाध्यायी मूल्यमापन, स्वयंमूल्यमापन, गटकार्य अशा प्रकारची अन्य साधने.)
                 वरील साधन तंत्रापैकी इयत्ता, विषय व उद्दिष्टे विचारात घेवून अधिकाधिक साधन तंत्राचा वापर करावा.

                मूल्यमापन करतांना किमान पाच ( दैनंदिन निरीक्षण सोडून चार) साधनतंत्राचा वापर करावा, तर कला व संगीत, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण व आरोग्य या विषयासाठी दैनंदिन तीन साधनतंत्राचा वापर करावा.

    # आकारीक मूल्यमापन वर्ग - विषयवार तसेच तंत्रवार गुणविभागणी, 4थी - 5वी परिसर अभ्यास भाग 1 व 2 सह पाहण्यासाठी इथे क्लिक करा.